सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील सौरभ सुरेश भोसले यांना परिसस्पर्श युथ क्रिएशन्स, कराड यांच्या वतीने “परिसस्पर्श युवा प्रेरणा पुरस्कार २०२०” पुरस्कार देण्यात आला. डॉ. चिन्मय एरंम्ब यांच्या हस्ते कराड येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सौरभ सुरेश भोसले यांनी आपल्या व्हिजन्सी कंपनीमार्फत “मिशन डिस्ट्रेस” आणि “बी द एक्सेप्शन” या दोन उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा, महाविद्यालयातील सोळा हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे.
या मार्गदर्शनासोबतच सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याशी निगडित विविध प्रश्नांवर समुपदेशन त्यांनी केलं आहे. महत्वाचं म्हणजे चारशेहून अधिक व्यक्तींना आत्महत्येपासून परावृत्त करून जगण्याची नवी उमेद सौरभ यांनी दिली आहे. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीत नुकसान झालेल्या कुटुंबियांच्या ५ पाच मुलींना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च उचलण्याची जबाबदारीही सौरभ यांनी घेतली आहे.
दिल्ली येथे झालेल्या युथ समिटमध्ये ६० देशातुन आलेल्या अडीचशे प्रतिनिधिंमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान त्यांना मिळाला. सातारा आणि औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या “युववाणी” कार्यक्रमामध्ये प्रसारित झालेल्या “महत्व मनाच्या आरोग्याचे” या मुलाखतींमधून त्यांनी दुर्लक्षित असलेल्या मानसिक आरोग्याच्या विषयाबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. अवघ्या २४ व्या वर्षी त्यांनी केलेले हे कार्य सर्व तरुणांसाठी प्रेरणादयी आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच कराडमधील “परिस स्पर्श युवा प्रेरणा २०२० पुरस्कार” देण्यात आला आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा
हे पण वाचा–
३१ जानेवारीपासून तुम्हाला ‘हे’ अॅप वापरता येणार नाही
मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा – राज ठाकरे