सातारा प्रतिनिधी| स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात पहिला क्रमांक मिळवलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड शहरातच स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याच समोर आलं आहे. कराड शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या.
या बाटल्यावरून याठिकाणी रात्री दारूड्यांचा अड्डा झाल्याच स्पष्ट होतं आहे. या पुतळ्याच्या चबुतऱ्यावरचं प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकचे कागद पडलेत. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींची आज जयंती आहे. त्या अगोदरच हा प्रकार उघडकीस आल्यान नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतायेत. स्वच्छ सर्वेक्षणाच्या स्पर्धेत बक्षिस मिळाल्यानंतर त्याची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. मात्र स्पर्धा झाल्यानंतर नगरपालिका प्रशासन सुस्त पडलेलं दिसत आहे.
रस्त्यासह शहरातील प्रमुख मार्गावर सध्या ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसत आहे. पावसामध्ये हा कचरा भिजत असून परिसरात दुर्गंधी सुटली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी ठेवली असतानाही त्यामध्ये कचरा टाकण्याऐवजी तो रस्त्यावर फेकला जातो. त्यामुळ अभियान राबवण्यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.