बीड,प्रतिनिधी, नितीन चव्हाण : वडवणी शहरात अनधिकृत हॉस्टेल चालकाकडून विद्यार्थ्यास जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शहरात खाजगी होस्टेलचा मनमानी कारभार सुरु असून शिकवणीच्या नावाखाली अज्ञान पालकांची सर्रास लूट होत आहे. वर्षभरासाठी विद्यार्थ्यांकडून 15 हजार ते 25 हजार रुपये फिस घेऊन लूट होत असून होस्टेल च्या सातवी वर्गातील विद्यार्थ्याला सोमवारी रात्री नऊ वाजता जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे खाजगी होस्टेलच्या विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील बीड परळी हायवेवरील एका खाजगी जागेत साई गुरूकुल नावाने खाजगी विना परवाना होस्टेल सुरू आहे. यामध्ये 50 विद्यार्थी हे राहत आहेत. प्रत्येकी 15-20 हजार रुपये वार्षिक फिस घेऊन चालू आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील उसतोड कामगार हे ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात दरवर्षी जातात. या कामगार यांच्या पाल्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी ऊसतोड मजूर हे शिक्षणासाठी खाजगी होस्टेल मध्ये ठेवून जातात. मात्र, खाजगी होस्टेल चालक विद्यार्थी यांना सुखसुविधा देण्याऐवजी चक्क मारहाण करत असल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे. साई गुरूकुल मधील शिक्षकांनी सातवी वर्गातील विद्यार्थी जाधव करण शिवाजी वय 12 याला सोमवार रोजी राञी डोळ्यावर, पाठीवर हातावर, गंभीर मार दिला असून सकाळी विद्यार्थी यांनी आजोबा यांना हा प्रकार सांगितला. माञ शिक्षकाविरोधात कुठेही तक्रार दिली नाही.