मुंबई प्रतिनिधी | देशाच्या अर्थव्यवस्थेत कामगाराचे अनन्यसाधारण महत्व असते. तसेच देशाच्या जडण घडणीत देखील कामगारांचे कष्टच अग्रस्थानी असते. भांडवलदार देशात मात्र कामगारांचे शोषण आणि पिळवणूक केली जाते. अशा शोषणाचा जिथे अतिरेक झाला तेथे कामगार लढा करण्यासाठी पेटून उठला. त्या कामगारांच्या शौर्य दिवस म्हणून १ मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो.
अमेरिकेतील कामगार विरोधी सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. ४ मे १८८६ रोजी शिकागो येथील हेमार्केटमध्ये कागरानांचे हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी मोठे प्रयत्न केले यात ६ कामगार मारले गेले. त्याचा बदला म्हणून एका कामगाराने पोलीसावर बॉम्ब हल्ला केला त्यात ८ पोलीस कर्मचारी मारले गेले. या घटनेची आठवण म्हणून १ मे हा दिसव कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. घी घटना ४ मे रोजी घडली असली तरी या आंदोलनाचा आरंभ १ मे रोजी झाला होता. म्हणून १ मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
याच घटनेच्या स्मरणार्थ १मे १८९० रोजी रेमंड लेविन यांनी आंतरराष्ट्रीय आंदोलन उभा करण्याचा संकल्प केला होता. त्यावेळी भरलेल्या पॅरिस १ मे हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आणि १८९१ च्या १ मे पासून जगभर कामगार दिन साजरा केला जावू लागला.