हॅलो विधानसभा | महाराष्ट्रातील 288 जागांसाठी येत्या २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याबरोबरच देशात 65 ठिकाणी पोटनिवडणुका होणार असल्याचंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलं आहे. यापार्श्वभुमीवर एक नजर टाकुयात २०१४ च्या विधानसभा निवडणुक निकालावर.
गेल्या वेळी 18 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. 2014 साली राज्यात 8 कोटी 25 लाख मतदार होते. 15 ऑक्टोबर 2014 रोजी एकाच टप्प्यात राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या होत्या.
चारच दिवसानंतर म्हणजे १९ आॅक्टोंबर रोजी निकाल जाहीर झाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १२२ जागी विजय प्राप्त झाला होता. तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. २०१४ साली काँग्रेस पक्षाला ४२ तर राष्ट्रवादीला ४१ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.