हॅलो विधानसभा । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटील यांनी टफ फाईट दिली होती. खडसे हे नवख्या १० हजार मतांनी निवडणूक जिंकले होते.
२०१४ साली शिवसेना आणि भाजपची युती असून देखील मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत रंगली होती. खडसे यांच्या विरुद्ध शिवसेनेचे जळगाव जिल्हाध्यक्षध चंद्रकांत पाटील यांनी जोरदार लढत दिली होती. पाच वेळा विधानसभा जिंकलेल्या खडसे यांना पाटील यांनी २०१४ साली मोदी लाट असूनदेखील घाम फोडला होता.
यंदा भाजपकडून एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिनी खडसे यांना उमेदवारी देण्यात आलीये. चंद्रकांत पाटील अपक्ष पाने निवडणूक लढवत आहेत. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने मुक्ताईनगर मध्ये चंद्रकांत पाटील यांना आपला पांठिम्बा जाहीर केल्यानं या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय