राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यादिवशी देशात होणार 1 ट्रिलियन रुपयांची आर्थिक उलाढाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरात तयारी करण्यात येत आहे. खास म्हणजे, अयोध्येबरोबर देशातील वेगवेगळ्या ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे 22 जानेवारीला देशांमध्ये एक ट्रिलियन रुपयांची उलाढाल होणार असल्याची माहिती ट्रेंडर्स संघटनेनी दिली आहे.

ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडेरेशनच्या अंदाजानुसार, 22 जानेवारी रोजी म्हणजेच राम मंदिराच्या लोकांना दिवशी देशात एक ट्रिलियन रुपयांची उलाढाल होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला देखील मोठा फायदा होईल. या 22 जानेवारीला लोकार्पण सोहळ्यामुळे आर्थिक घडामोडींना देखील जास्त चालना मिळेल. तसेच अनेक तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होईल. इतिहास नव्हे तर लोकांना, अनेक विविध व्यवसाय करण्याची संधी देखील मिळेल.

समोर आलेल्या माहितीनुसार, देशभरामध्ये राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त 30 हजारपेक्षा अधिक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांची आखणी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त करण्यात आली आहे. तसेच, श्री राम पद यात्रा, श्रीराम स्कूटर, कार यात्रा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांसाठी अधिक खर्च होणार आहे.

सध्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आणि रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठानिम्मित बाजारामध्ये अनेक विविध वस्तू विकण्यासाठी आल्या आहेत. प्रभू श्री राम यांच्या मूर्ती, झेंडे, बॅनर, टोप्या , शर्ट, कुर्ती , फुले, माळा, पूजेसाठी लागणारी साधनसामग्री, फोटो फ्रेम्स अशा अनेक गोष्टी विकण्यासाठी आल्या आहेत. यामुळेच लोकांना रोजगाराचा मार्ग देखील निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशामध्ये या काळात आर्थिक उलाढालीला जास्त चालना मिळेल हे स्पष्ट दिसत आहे.