व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादीचे 10-15 आमदार शिंदे- फडणवीसांच्या संपर्कात; उदय सामंतांच्या दाव्याने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज आहेत असं विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यांनतर आता शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचेच १० ते १५ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत असं म्हणत खळबळ उडवून दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, आपल्या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी म्हणून कदाचित अजित पवार आम्ही नाराज आहे असं म्हणत असतील पण खरे तर त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. अजित पवारांनी केलेलं विधान म्हणजे या आमदारांना थांबवण्यासाठी केलेली ही वक्तव्य आहेत असे म्हणत उदय सामंत त्यांनी अजितदादांवर पलटवार केला.

दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याने आम्ही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजपसाठी सोडली असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले . आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळावे यासाठी लढाई सुरु राहील. चिन्ह न मिळाल्याने आम्ही सुद्धा नाराज आहोत असे ते म्हणाले.