Monday, January 30, 2023

भुईंज ग्रामपंचायत : भाजप नेते मदन भोसले गटाकडे सरपंचपदासह 10 जागा तर मकरंद आबांचे 6 उमेदवार विजय

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

वाई तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भुईंज ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकाय वातावरण चांगलेच तापले होते. या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नेते मदन भोसले यांच्या गटात व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या गटात अटीतटीची लढत झाली. अखेर भुईज ग्रामपंचायतीवर भाजप नेते मदन भोसले यांच्या गटाला सरपंच पदासह 10 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील यांच्या गटाला 6 जागांवर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

वाई तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील, तर काही ग्रामपंचायतींवर किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या गटाची सत्ता आहे. ग्रामीण भागातील सत्तास्थानावरच आमदारकीच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे ग्रामपंचायतीवर सत्ता अबाधित राखण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून खूप प्रयत्न करण्यात आले आहे.

वाई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमुळे भाजप नेते मदन भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस आमदार मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकंदरीत वाई तालुक्यातील भुईंज ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यात भाजप नेते मदन भोसले यांना यश आले आहे.