राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या इलेकट्रीक बसेस धावत आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात इ बसेस ची संख्या वाढल्यामुळे एस टी चा प्रवास अधिक सुखकर होऊ लागला आहे. २०२१ साली ठरवलेल्या धोरणानुसार राज्य परिवहन महामंडळातील किमान १५ टक्के गाड्या इलेक्ट्रिक प्रकारातील असतील असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यभरात आंलबजावणी करण्यात येत असून महामंडळामार्फत ५१५० इलेक्ट्रिक बस चालनात आणण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
यामध्ये नाशिकचा देखील समावेश असून पहिल्या टप्प्यात नाशिक विभागात१४ ई-बसेस नाशिक-बोरीवली, नाशिक-स.गड, नाशिक-त्र्यंबक व नाशिक-शिर्डी या मार्गावर चालनात आहे. तर दुस-या टप्प्यात १० ई-बसेस प्राप्त झाल्या आहे. उद्यापासून म्हणजेच २८ ऑगस्ट पासून या बसेस नाशिक-शिर्डी, नाशिक-सित्रर व नाशिक-त्र्यंबक मार्गावर चालविण्यात येणार आहेत. सकाळी ५.०० ते सं. २२.०० वाजेपर्यंत दर एक तासाच्या वारंवारीतेने सदरच्या बसेस नाशिक-सित्रर / नाशिक-त्र्यंबक या नविन बसस्थानकावरुन (ठक्कर) व नाशिक-शिर्डी महामार्ग बसस्थानक येथुन सुरु होणार आहेत.
काय आहेत बसची वैशिष्टे ?
या बसची सेवा पर्यावरणपुरक असून त्यामुळे प्रदूषण होणार नाही.
सदर बस सेवेमध्ये ५ ते १० वर्षा पर्यंतच्या मुलांना अर्ध्या तिकीटाची सवलत अनुज्ञेय राहील.
सदर बस सेवेमध्ये महिला, अमृत जेष्ठ नागरीक, जेष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्ती व त्यांचे साथीदार अर्जुन / द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी, विद्यमान तसेच माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य, अधिस्विकृतीधारक पत्रकार तसेच शहीद सन्मान योजने अंतर्गत शहीद जवानांच्या विरपत्नी यांना सवलतीच्या दराने प्रवास अनुज्ञेय राहील. सदर पर्यावरणपुरक सेवेचा लाभ घ्यावा.