आजपासून लग्नसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीला सुद्धा अनेक जण त्या निमित्ताने प्राधान्य देताना दिसतात. अशातच सोने खरेदीदारांसाठी मोठी खुशखबर आहे कारण आज देखील सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. आज सलग सहावा दिवस सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे. 14 नोव्हेंबर 2024 रोजी सलग सहाव्या दिवशी सोन्यामध्ये घसरण झालेली दिसत आहे. आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव कमी होऊन 76 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आला आहे. तर मुंबईमध्ये 76,840 रुपये प्रति दहा ग्राम सोन्याचा दर आहे. चला जाणून घेऊया 22,24 आणि 18 कॅरेट चे सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट
22 कॅरेट सोने ज्या मध्ये सोन्याचे दागिने घडवले जातात त्या 22 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा आजचा दर 6,935 रुपये आहे. हाच दरकाला 7045 रुपये इतका होता त्यामुळे आज 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 110 रुपयांची घट झाली आहे. तर 22 कॅरेट 10 g सोन्याचा आजचा भाव 69,350 रुपये आहे. हाच दर काल 70450 रुपये होतात आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या घरामध्ये एक हजार शंभर रुपयांची घट झाली आहे.
24 कॅरेट
दुसरीकडे शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोन्याच्या दाराबद्दल बोलायचं झाल्यास एक ग्राम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव सात हजार 565 रुपये इतका आहे. हाच दरकाल 7,685 रुपये इतका होता. आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दारामध्ये 120 रुपयांची घट झाली आहे. तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 75 हजार 650 रुपये इतका आहे. आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 1200 रुपयांची घसरण झाली आहे.
18 कॅरेट
18 कॅरेट सोन्याच्या दाराबद्दल बोलायचं झाल्यास एक ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 5,674 रुपये इतका असून आजच्या दरामध्ये 90 रुपयांची घसरण झाली आहे. तर दहा ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 56 हजार 740 रुपये इतका आहे. आज दहा ग्रॅम 18 कॅरेट सोनं 900 रुपयांनी घसरले आहे.