खंबाटकी बोगद्या बाहेर विचित्र अपघात, 10 जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंबाटकी बोगद्या बाहेर विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात सुमारे दहा जण जखमी झाले. या विचित्र झालेल्या अपघातामध्ये दोन कंटेनर, तीन चार चाकी वाहने व एक पिकप अशी जवळपास सहा वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे.

या अपघातात अजिंक्य शिंदे (वय २५), अतुल मोहन शिंदे (वय २६), कल्पना गजानन शिंदे (वय ५५), नवनाथ गेनबा शिंदे (वय ७०), लता मोहनराव शिंदे (वय ५२), प्रकाश शामराव शिंदे (वय ५०, (सर्व रा. चौधरवाडी, ता. कोरेगाव), संदीप राऊत (वय ३०, रा. काळगाव, ता. पाटण), नारायण ढमाळ (वय ३० रा. पारगाव) हे लोक जखमी झाले. हा अपघात झाल्याने वाहतूक 2 तास खोळंबली होती. खंडाळा पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात दाखल केले

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,बोगदा ओलांडल्यानंतर पहिल्याच वळणावर भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने गाडीला जोरदार धडक देऊन ट्रक ३० फूट दरीत पलटी झाला. त्याचवेळी दहा मिनिटांच्या अंतरावर पाठीमागून आलेल्या एका टेंपोने आणखी तीन वाहनांना धडक दिल्याने टेंपो दरीत कोसळला.

अपघातस्थळी मदतीसाठी आलेले सामाजिक कार्यकर्ते नारायण ढमाळ यांना एका वाहनाने धडक दिल्याने तेही जखमी झालेले आहेत. अपघात झाल्याने वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. मात्र, खंडाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

घटनास्थळी खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, एएसआय राजू अहिरराव, पोलिस अमंलदार पी. एम. फरांदे शिवाजी पांब्रे , संजय पोळ, सुनील गायकवाड संदीप जाधव, सचिन शेलार, संजय जाधव, भुईंज पोलीस स्टेशनचे कर्मचारी, हायवे पेट्रोलिंग टीम व मदतनीस म्हणून जयवंत जाधव, अय्याज पठाण, पृथ्वीराज गायकवाड यांचे सहकार्य लाभले.