रामदेव बाबांची मोठी घोषणा!! 10 हजार कोटींची करणार गुंतवणूक; हजारो तरुणांना देणार रोजगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन|  योगगुरू रामदेव बाबा यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. रामदेव बाबा यांनी पतंजलीच्या माध्यमातून काही दिवसात 10  हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली आहे. या गुंतवणुकीच्याद्वारे ते हजारो तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत. त्याचबरोबर आरोग्यापासून ते शिक्षणात पर्यंतच्या सर्व संधी या गुंतवणुकीच्या माध्यमातून तरुणांना देण्यात येणार आहेत.

यासंदर्भात माहिती देत रामदेव बाबा म्हणाले की, “आतापर्यंत आम्ही उत्तराखंडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. पतंजली 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून 10 हजार लोकांना रोजगार देणार आहे. मी सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना आवाहन करतो की, उत्तराखंडमध्येही त्यांचे एक कॉर्पोरेट घर बांधावे.” तसेच, डेहराडून विमानतळ 24 तास सुरू राहण्याची मागणी रामदेव बाबा यांनी केली आहे. त्यामुळे उद्योगपतींना अधिक फायदा होईल असे मत रामदेव बाबा यांनी मांडले आहे.

दरम्यान, 8 डिसेंबर रोजी रामदेव बाबा यांनी उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 मध्ये सहभाग नोंदवला होता. या शिखर परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ज्यामध्ये अदानी समुहाचे संचालक प्रणव अदानी, JSW MD सज्जन जिंदाल, ITC MD संजीव पुरी, Emaar India CEO कल्याण चक्रवर्ती, असे अनेक प्रमुख उपस्थित होते.