मुकेश अंबानींच्या ताब्यात येणार 100 चॅनेल; लवकरच होणार मोठा करार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतीय मीडिया इंडस्ट्रीमध्ये वर्चस्व स्थापित करण्याच्या मार्गावर आहेत. कारण की आता लवकर मुकेश अंबानी एक मोठा करार करणार आहेत. हा करार पूर्ण झाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या ताब्यामध्ये 100 पेक्षा अधिक चॅनेल आणि दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म येतील. समोर आलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्नेचे विलीनीकरण प्रक्रिया जवळपास निश्चित झाली आहे.

ही चर्चा पुढे गेली असून Star India आणि Viacom18 यांच्या विलीनीकरणांमध्ये तब्बल शंभरहून अधिक टीव्ही चॅनेल आणि दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. पुढे जाऊन हे विलीनीकरण पुर्ण झाले तर मीडिया व्यवसायातील आत्तापर्यंतचे हे सर्वात मोठे विलगीकरण मानले जाईल. महत्वाचे म्हणजे, Star – Viacom18 विलीनीकरण युनिटमध्ये 51 टक्क्यांहून अधिक हिस्सा रिलायन्सचा असू शकतो. तर डिस्नेचा फक्त 40 टक्के वाटा राहिला. यामध्ये उदय शंकर आणि जेम्स मर्डोक बोधी ट्री सिस्टीम्सचा विलीनीकरणमध्ये सात ते नऊ टक्के हिस्सा असू शकतो.

25,000 रुपयांची कमाई..

एवढेच नव्हे तर, रिलायन्स विलीनीकरण युनिटमध्ये देखील अतिरिक्त भांडवल गुंतवण्याच्या तयारीत आहे. पुढे जाऊन नवीन कंपनी थेट सहाय्यक कंपनी म्हणून तयार करण्यात येईल असा हेतू यामागे आहे. गेल्या वर्षी Star आणि Viacom18 ने 25,000 रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे पुढे जाऊन विलीनीकरणाचा फायदा होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये टीव्ही आणि डिजिटलबरोबर संयुक्त युनिटकडे इंडियन सुपर लीग आणि प्रो कबड्डी लीगचे देखील हक्क असणार आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करून रिलायन्स मोठी योजना आखत असल्याचे दिसून येत आहे.