स्वस्तात मिळणार ‘ही’ 100 औषधे; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. याचे कारण म्हणजे सरकार कडून ताप, हृदय, वेदना, सांधेदुखी यासह एकूण १०० औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने याबाबत एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये इंग्रजी औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी ६९ फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. औषोधोपचारासाठी देशातील जनतेच्या खिशहला मोठा चाप बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

स्वस्त झालेल्या या औषधांच्या यादीमध्ये अँटी-टॉक्सिन्स, कोलेस्टेरॉल, साखर, वेदना, ताप, संसर्ग, जास्त रक्तस्त्राव थांबवणे, कॅल्शियम, व्हिटीडी ३ आणि लहान मुलांसाठी अँटीबायोटिक्स यांचा समावेश आहे. दैनंदिन जीवनामध्ये ही औषधें सतत लागतात आणि यावर वारेमाप पैसे खर्च करावा लागतो. परंतु आता या सर्व औषधांच्या किमती कमी झाल्यामुळे रुग्णांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. सरकारी अधिसूचनेनुसार नवीन पॅकिंगवर नवे अपडेटेड दर असतील. त्याच वेळी, डीलर नेटवर्कला देखील नवीन किंमतींची माहिती द्यावी लागेल.

खरं तर २०२० मध्ये जेव्हा देशात कोरोना विषाणूने थैमान घातले, तेव्हा औषधांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. जवळपास दुपटीने औषधांचे दर वाढले होते. आता कोरोना आटोक्यात आला असून देश पुन्हा एकदा पूर्वपदावर आला आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारीच्या सुरुवातीला औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. आता महिनाभरात दुसऱ्यांदा औषधांच्या किमती पुन्हा कमी केल्याने सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.