मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पंतप्रधानांना पाठवण्यात आले 1000 पोस्टकार्ड

0
30
maratha aarakshan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पळशी : पंतप्रधानांना १ हजार पोस्टकार्ड मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पाठवण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख यांच्या सूचनेनुसार पंतप्रधानांना पळशी आणि परिसरातून तब्बल १ हजार पोस्टकार्ड पाठवण्यात आले आहेत. यात मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सिल्लोड/सोयगाव तालुक्याचे नेते ठगणराव भागवत, सिल्लोड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल राऊत, पळशीचे सरपंच अरविंद बडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

यावेळी सिल्लोड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग बड़क दत्तू बडक, अर्जुन बडक गणेश बडक, काकासाहेब बडक, सुधाकर पुंगळे, प्रकाश जोनवाळ, गणेश सुरे, रमेश महेर, सागर महेर, शिवाजी कुदळे, राहुल बडक, एकनाथ बडक, कृष्णा बडक, योगेश बडक, रामेश्वर बडक, शरद बडक, विष्णू बडक, रावसाहेब बडक, भास्कर बडक, दत्ता राकडे, गांधी महेर, कृष्णा राऊत, कैलास बडक, अंबादास बडक, सागर बडक, गजानन बिडवे यांच्यासह आदी उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here