विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 10 वी-12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शालेय क्षेत्रात दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा (Board Exam) विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळेच या परीक्षांचा जास्त तणाव देखील विद्यार्थ्यांवर येतो. मात्र आता विद्यार्थ्यांवरील हा तणाव कमी करण्यात येणार आहे. कारण की, “2025-25 च्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा 10वी 12वीची बोर्डाची परीक्षा देता येईल” असे वक्तव्यं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.

सोमवारी ‘पीएम श्री’ या योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेला दोनदा बसण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवणं, त्यांना गुणवत्तेनं समृद्ध करणं, त्यांना संस्कृतीशी जोडून ठेवणं आणि त्यांना भविष्यासाठी तयार करणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय असेल. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे हेच सूत्र ठरेल”

तसेच, “मागील सरकारमध्ये शिक्षणाला प्राधान्य देण्यात येतं नव्हते. मात्र आता विष्णू देव साईंच्या राजवटीत शिक्षणालाच आपलं प्राधान्य असल्याचं दिसून येतं. आता पीएम श्री योजनेच्या पहिल्या टप्प्यात छत्तीसगडमधील 211 शाळा ‘हब आणि स्पोक मॉडेल’वर अपग्रेड केल्या जातील” असे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा बोर्डाच्या परीक्षा देण्यात येतील, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी केल्यामुळे याचा मोठा दिलासा विद्यार्थ्यांना मिळाला आहे. मात्र या एका निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील किती परिणाम होईल हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.