हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ (CBSE) ने शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा बदल 2026 पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे . या नवीन प्रणालीमध्ये कंपार्टमेंट परीक्षांची प्रक्रिया संपुष्टात येईल आणि विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये भाग घेऊन गुणांमध्ये सुधारण करण्याची संधी मिळेल. तर हि नवीन प्रणाली कशी असणार हे आज आपण थोडक्यात जाणून घेऊयात.
नवीन प्रणालीची मुख्य वैशिष्ट्ये –
दोन परीक्षा – वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्यात येतील. पहिली परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये आणि दुसरी परीक्षा मे मध्ये होईल.
पूर्ण अभ्यासक्रम – दोन्ही परीक्षांमध्ये पूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट केला जाईल.
कंपार्टमेंट सिस्टीम संपुष्टात – कंपार्टमेंट परीक्षांची प्रक्रिया संपुष्टात येईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये भाग घेऊन गुणांमध्ये सुधारण करण्याची संधी मिळेल.
परीक्षा पॅटर्नमध्ये बदल – परीक्षा पॅटर्नमध्ये बदल करण्यात येईल, ज्यामध्ये विश्लेषणात्मक आणि संकल्पना आधारित प्रश्नांवर जास्त भर दिला जाईल.
शिक्षा तज्ज्ञांचे मत –
“हा बदल विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे आणि त्यांना परीक्षांच्या तणावातून मुक्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे बाल भारती पब्लिक स्कूलचे प्रिंसिपल एल. व्ही. सहगल म्हणाले आहेत.
नवीन प्रणालीचे परिणाम –
या नवीन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तणावातून मुक्त करण्यात मदत होईल आणि त्यांना गुणांमध्ये सुधारण करण्याची संधी मिळेल. यामुळे परीक्षा परिणामांची घोषणा लवकर होईल आणि विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी जास्त वेळ मिळेल.
आताच पॅटर्न –
सध्या CBSE 10वीच्या परीक्षा एकदाच घेतल्या जातात. या परीक्षांच्या निकालांवरच विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवले जाते. मात्र, या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा परिणाम सुधारण्याची संधी मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव पडतो.