हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ज्या व्यवसायिकांना आणि शेतकऱ्यांना आपल्या मालाच्या साठवणुकीसाठी गोदाम उभारायचे आहे त्यांना सरकारकडून 12 लाख 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. थोडक्यात सांगायचे, झाले तर, राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान (कडधान्य) व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात 250 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधण्यासाठी खर्चाच्या 50 टक्के अनुदान मिळेल.
येथे करावेत अर्ज
महत्वाचे म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलै पूर्वी आपले अर्ज तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे जमा करावे लागणार आहेत. या अर्थासह सातबारा, आधारकार्ड, बँक खात्याचा आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत. लक्षात घ्या की, या कागदपत्रांमध्ये खोट निघाल्यास किंवा चुकीची माहिती आढळल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही.
दरम्यान, ज्या संघांना किंवा कंपन्यांना बांधकामासाठी परवानगी मिळाली आहे त्यांना गोदामाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर योजनेची रक्कम दिली जाईल. ही रक्कम शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पद्धतीने जमा केली जाईल. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी संघाने आणि कंपन्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे.