गंगेत स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 12 जण जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाहजहांपूरमध्ये ट्रक आणि टेम्पोची धडक झाल्यामुळे 12 भाविकांचा जागेस मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटे ही अपघाताची घटना घडली (Accident News) आहे. या अपघाताविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सांगितले जात आहे की, शाहंजहापूर येथील दमगडा गावचे काही भाविक गंगेत स्नान करण्यासाठी जात होते. याचवेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघातानंतर, ऐकू येणाऱ्या किंचाळ्या, रस्त्यावर पडलेले मृतदेह याने परिसर सुन्न झाला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटेच्या वेळी दमगडा गावचे भाविक गंगेत स्नान करण्यासाठी रिक्षाने पांचाळ घाटाकडे निघाले होते. याचवेळी सुगुसुगी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की रिक्षा जागीच चक्काचूर झाली. तसेच, रिक्षातील 12 भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 8 पुरुष, 3 महीला आणि एका लहान बाळाचा समावेश आहे.

महत्वाचे म्हणजे, या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत ट्रक चालक तेथून फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद करत ताबडतोब जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी दाट पडलेल्या धुक्यांमध्ये वाहणे न दिल्यामुळे झाला आहे. सध्या या घटनेनंतर परिसरात व्यक्त केली जात आहे.