व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

I Love You म्हणत 12 वर्षीय मुलीची आईसमोर क्रूरपणे हत्या, एकतर्फी प्रेमातून उचलले टोकाचे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकतर्फी प्रेमातून कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात एका 12 वर्षीय मुलीची तिच्याच आईसमोर चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपी मुलाचे नाव आदित्य असून तो देखील 20 वर्षीय आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून या निरागस मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे तिसगाव परिसरात खळबळ माजली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य या मुलीच्या मागे लागला होता. परंतु तिने त्याला नकार दिल्यानंतर आदित्यने रागात तिची चाकू भोसकून हत्या केली आहे. हत्या करताना देखील तो तिच्याकडून अत्यंत क्रूरपणे आय लव यू वाक्य म्हणण्यास वदवून घेण्याचा प्रयत्न करत होता.

नक्की काय घडले?

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत 12 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासहित तिसगाव परिसरातील दुर्गा सोसायटीत राहत होती. गेल्या अनेक दिवसांपासून आदित्यची या मुलीवर नजर होती. तो तिचा सतत पाठलाग देखील करत होता तर दोन वेळा त्याने तिला प्रेमाची मागणी घातली होती. परंतु या दोन्ही वेळा तिने त्याला थेट नकार कळविला होता. बुधवारी सायंकाळच्या दरम्यान सर्वांना वडापाव खायचा असल्यामुळे मुलगी आईसोबत वडापाव आणण्यासाठी परिसरात गेली होती. वडापाव घेऊन परत येताना जिन्यावर लपून बसलेल्या आदित्यने मुलीवर हल्ला केला.

यावेळी आईने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र आदित्यने तिला देखील ढकलून मुलीवर सात ते आठ चाकूने वार केले. क्रूरता म्हणजे, चाकूने वार करत असताना देखील आदित्य तिला आय लव्ह यू म्हणत होता. तसेच तीला देखील म्हणण्यास सांगत होता. हल्ला केल्यानंतर आदित्य तेथून फरार झाला. मात्र रहिवाशांनी पाठलाग करून त्याला पकडले. तो तोपर्यंत आदित्यने देखील फिनेल पिले होते. रहिवाशांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. तर आदित्य याच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आदित्यवर गुन्हा दाखल केला आहे. आज एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेने सर्वांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे.