औरंगाबाद | यावर्षी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रोमोट करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही महाविद्यालयांनी अकरावीच्या ऑनलाईन ऑफलाईन परीक्षा घेऊन निकाल जाहीर केला असून बारावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. असे प्राचार्यांनी सांगितले आहे.
यंदा कोरोना महामारीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आला असला तरीही दुसरीकडे अकरावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रश्न पाठवून ऑफलाइन पद्धतीने उत्तर पत्रिका मागून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर काही महाविद्यालयांच्या परीक्षा अजूनही सुरूच असून काही महाविद्यालयांनी ऑनलाईन परीक्षा घेऊन त्यांचे निकाल ऑफलाईन पद्धतीने जाहीर केले आहेत.
कोरोना महामारीचा काळ पाहता महाविद्यालयाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याची तयारी दर्शवली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत देऊन ऑफलाइन पद्धतीने काही महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. बऱ्याच महाविद्यालयाने ऑनलाइन पद्धतीने बारावीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आणि कर्मचारी सुद्धा नियुक्त केलेले आहेत.