उन्हाळी सुट्टीचा प्रवास गारेगार ! नागपूर-पुणे दरम्यान धावणार 14 अतिरिक्त AC रेल्वेगाड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पुणे किंवा नागपूरला जाण्याचा प्लॅन करताय, आणि गर्दीमुळे टेन्शनमध्ये आहात? काळजी सोडा! मध्य रेल्वेने तुमच्यासाठी खास व्यवस्था केली आहे – पुणे-नागपूर मार्गावर १४ साप्ताहिक सुपरफास्ट वातानुकुलीत विशेष गाड्या धावणार आहेत

प्रवासाचा तपशील

  • गाडी क्र. 01439: पुण्याहून प्रत्येक शनिवारी रात्री 7:55 वाजता सुटेल, दुसऱ्या दिवशी दुपारी 2:45 वाजता नागपूरला पोहोचेल.
  • गाडी क्र. 01440: नागपूरहून प्रत्येक रविवारी दुपारी 4:15 वाजता सुटेल, दुसऱ्या दिवशी सकाळी 7:20 वाजता पुण्याला पोहोचेल.

गाडीचे थांबे: दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा.

कोच रचना: 8 एसी 2-टियर, 10 एसी 3-टियर, 2 गार्ड ब्रेक व्हॅन – एकूण 20 डबे.

भिवंडी – सांकराईल अनारक्षित विशेष (01149/01150)

  • ९ ते २३ एप्रिल दरम्यान दर बुधवारी
  • भिवंडी – सांकराईल मार्गावर
  • कल्याण, नाशिक, जळगाव, नागपूर, रायपूर, टाटानगर, खडगपूर यांसह अनेक थांबे
  • कोच: 10 सामान्य, 2 गार्ड ब्रेक व्हॅन, 10 पार्सल व्हॅन
  • खडगपूर – ठाणे अनारक्षित विशेष (01150)
  • १२ ते २६ एप्रिल दरम्यान दर शनिवारी
  • खडगपूर ते ठाणे
  • टाटानगर, राउरकेला, नागपूर, भुसावळ, नाशिक इ. थांबे
  • कोच: 10 सामान्य, 2 गार्ड ब्रेक व्हॅन, 10 पार्सल व्हॅन

अनारक्षित गाड्यांचे तिकीट सामान्य दरात यूटीएस अ‍ॅप किंवा स्टेशनवर उपलब्ध आहेत. तर मग वेळ वाया घालवू नका – तिकीट बुक करा आणि आरामदायी प्रवासासाठी सज्ज व्हा