बच्चू कडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू याना गिरगाव कोर्टाने मोठा दणका दिला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी कोर्टाकडून बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज ते स्वत: आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले होते. कोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला असून न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्यात आदेश देत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बच्चू कडू याना ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिल्यांनतर बच्चू कडू तुरुंगात जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी लगेच सत्र न्यायालयात अपील केले आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयानंतरच बच्चू कडू तुरुंगात जाणार की नाही याबाबत निर्णय होईल.