World Cup 2023 : BCCI ची मोठी घोषणा!! भारत- पाक सामन्यासाठी 14 हजार अतिरिक्त तिकिटे जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 5 ऑक्टोंबरपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला म्हणजेच वर्ल्ड कपला (World Cup 2023) सुरुवात झाली आहे.वर्ल्ड काप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना (IND Vs PAK) म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी नवी मांदियाळीच… भारत आणि पाकिस्तानचा सामना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमी सर्वात जास्त उत्सुक असतात.त्यातच येत्या 14 ऑक्टोंबर रोजी अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने एक मोठी घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी 14,000 अतिरिक्त तिकिटे जारी करण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे.

कुठे मिळतील तिकिटे- World Cup 2023

याबाबतची माहिती देताना BCCI ने अलीकडे जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, बीसीसीआयने अहमदाबाद येथे 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी अतिरिक्त 14,000 तिकिटे जारी करण्याची घोषणा केली आहे. 8 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता तिकीट विक्री सुरू झाली आहे. ही तिकीटे अधिकृत तिकीट वेबसाइटवरून (ICC World Cup 2023 Tickets Booking) खरेदी करता येतील. यामुळे क्रिकेट रसिकांना आणि चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी जागा रिझर्व्ह करण्याची संधी मिळेल.

भारतामध्ये तब्बल 11 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये हा एकदिवसीय सामना होणार आहे. त्यामुळे हा सामना प्रत्येक भारतीय व्यक्तीला आणि क्रिकेटप्रेमींना स्टेडियमवर जाऊन पाहता येणार आहे. यासाठी 14,000 तिकिटे जारी करण्यात आली आहेत. 8 ऑक्टोबरपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार सामना

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील (World Cup 2023) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियमची क्षमता सुमारे 1 लाख 32 हजार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादिवशी तर हे स्टेडियम खचाखच भरले जाईल. यंदा भारत पाकिस्तान सामना भारताच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार असल्यामुळे सर्वात जास्त गर्दी दिसून येईल.