चिमुकल्याची कमाल!! शक्कल लढवत पाण्याच्या जारपासून बनवला मिनी कूलर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आपल्या भारतामध्ये जुगाड्याची अजिबात कमतरता नाही. अनेक लोक त्यांच्या घरगुती समस्याचे निराकरण करण्यासाठी अनेक जुगाड करत असतात. अनेकवेळा एखादे काम शास्त्रज्ञ आणि यंत्र करू शकत नाही. ते काम भारतातील लोक जुगाड्याद्वारे सोडवतात. असेच एक जुगाड कांतीलाल याने केलेला आहे. दहावीत शिकणाऱ्या या कांतीलालने पाण्याच्या भांड्याचा कुलर बनवलेला आहे. जो सध्या चांगला चर्चेत आहे. कांतीलाल हा अवघ्या 14 वर्षाचा आहे. परंतु त्याचा हा नवीन जुगाड पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे.

कांतीलाल हा पदरू या गावातील आहे. त्याने पाण्याच्या भांड्याचे एका कुलरमध्ये रूपांतर केलेले आहे. विजेवर न चालणारा हा पोर्टेबल कुलर पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. बाडमेर जिल्हा मुख्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनात त्याने हा पोर्टेबल कुलर सादर केला आहे. तेव्हा सर्वजण पाहतच राहिले. या कुलरची किंमत केवळ 500 रुपये एवढी आहे.

सध्या सर्वत्र उन्हाळा चालू आहे. अशा परिस्थितीत उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत आहे. अशातच या 14 वर्षाच्या कांतीलालने जुगाड्याद्वारे एका कुलरची कल्पना आणली, त्याचा हा कुलर सध्या चांगलाच चर्चेत आहे. कांतीलालने पाण्याचे भांडे कापून त्याला कुलरचा आकार दिला आहे. याला वीज लागत नाही. तसेच मोठ्या जागेची गरजही लागत नाही. तो सहज कुठेही नेला जाऊ शकतो. त्याची बॅटरी, स्विच, पंखा, जाळी हे सगळे बसवण्यात आलेले आहे.त्याद्वारे हा कुलर चालत आहे. विज्ञान प्रदर्शनात सादर केलेला त्याचा हा प्रकल्प सध्या चांगला चर्चेत आहे. त्याचप्रमाणे 14 वर्षाच्या मुलाने हा एक अनोखा प्रयोग केला. यामुळे त्याचे कौतुक देखील होत आहे.