दक्षिण कोरियात Halloween Party मधील दुर्घटनेत 149 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी आऊटडोर नो मास्क हॅलोविन पार्टी (Halloween Party) आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी देशाची राजधानी सिऊलमध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी (Halloween Party) जमली होती. या गर्दीमुळे त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये 149 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोरियाची राजधानी सिऊलमध्ये खचाखच भरलेल्या हॅलोविन उत्सवात (Halloween Party) झालेल्या गर्दीत किमान 149 लोक ठार आणि डझनभर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीदरम्यान अनेकांना हृदयविकाराचा झटका आला आणि अनेकांचा श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांचा यामध्ये मृत्यू झाला.

https://twitter.com/dRwjTWgcDffvTWz/status/1586382281551159296

दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले कि, सोलच्या मुख्य पार्टी केंद्र असलेल्या हॅमिल्टन हॉटेलच्या दिशेने जात असलेल्या लोकांची गर्दी एका चिंचोळ्या गल्लीत घुसली आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये (Halloween Party) अनेकांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेतील जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!