उसाच्या शेतात लपवलेला 15 लाखांचा गांजा जप्त; सातारा पोलिसांची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
उसाच्या शेतात लपवलेला 15 लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. साताऱ्यातील माण तालुक्यातील म्हसवड येथे हि कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी चरण लालासो शिंदे या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाणवण (ता. माण) येथील चरण लालासो शिंदे याने घराजवळील शेतामध्ये गांजाचा साठा करुन उसाच्या शेतामध्ये लपवून ठेवला होता. त्या संबंधीत माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी म्हसवड पोलिसांच्या मदतीने छापा मारून गांजा जप्त केला . सुमारे १५ लाख रुपये किमतीचा गांजा ३ पोत्यांमध्ये लपवुन ठेवल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत चरण लालासो शिंदे यास अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची पाेलिस कसून चाैकशी करीत आहेत.

शेतकरी मित्रानो, शेतकऱ्यांचे जीवन अगदी सोप्प करण्यासाठी हॅलो कृषी हे अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. वेगवगळ्या फळांची, रोपांची लागवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या तुमच्या आसपासच्या रोपवाटिका तुम्हाला या अँपच्या माध्यमातून जोडल्या जातील. अगदी कोणताही वेळ आणि पैसे न घालवता शेतीविषयक संपूर्ण माहिती, शेती अवजारे, बी- बियाणे, सातबारा उतारा, हवामान अंदाज, जमीन मोजणी, शेतीबाबत मार्गदर्शन तुम्हाला Hello Krushi अँप च्या माध्यमातून मिळेल. आणि महत्त्वाचे हॅलो कृषीच्या माध्यमातून शेतकरी त्याने स्वतः पिकवलेला शेतमाल त्याला हव्या त्या किमतीत विकू सुद्धा शकतात. त्यामुळे गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, उपनिरीक्षक रवींद्र डोईफोडे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, गणेश कचरे, मुनीर मुल्ला, पोना प्रमोद सांवत, अमित सपकाळ, गणेश कापरे, मयुर देशमुख, धीरज महाडीक, मोहसीन मोमीन, संकेत निकम, वैभव सावंत, स्वप्नील दौंड यांनी ही कारवाई केली.