हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आम्ही आज आलेलो आहोत. ती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता आणि मानधन या महिन्यात वाढणार आहे. राज्य सरकारने यासाठी तब्बल 163.43 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतनीस यांना लवकरच त्यांचे पैसे देखील मिळणार आहे.
नवी मुंबई मधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून वेळेवर निधी प्राप्त होत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना वेळेवर मानधन मिळत नाही. यावेळी एक बैठक झाली आणि या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम देण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला. आता या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतीनीस यांना देण्यासाठी एकूण 163.43 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने मंजुरी देखील दिली आहे. अंगणवाडी सेविकांचे राहिलेले मानधन देखील त्यांना लवकरच मिळणार आहे.
या आधीच महायुती सरकार सरकारने अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीस यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता येत्या काळात त्यांना जास्त पैसे मिळणार आहे. आत्ता अंगणवाडी सेविकांना 10 हजार रुपये आणि मदतनीस यांना 5 हजार रुपये एवढे मानधन दिले जाते. परंतु आता अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 5000 रुपयांनी आणि मदत 3000 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा महायुती सरकारने केलेली आहे. त्यामुळे येथे काळात अंगणवाडी सेविकांना 15000 रुपये आणि मदतनीस यांना 8000 रुपये मिळणार आहे.