सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सन 2022-23 मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय साताऱ्यानी 163.11 कोटी इतका महसुलाची प्रत्यक्ष वसुली करुन एकूण उद्दिष्टाच्या 104 टक्के पुर्तता केली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा विनोद चव्हाण यांनी दिली. यावेळी कोणत्या गोष्टसाठी किती रुपये दंड आकारला याचा तपशीलही देण्यात आला आहे.
यामध्ये वायुवेग पथकाने 378.01 लाख इतके तडजोड शुल्क वसुल केले आहे. तर कर वसुली 375.23 लाख इतकी केली आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या 1 हजार 253 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणारे 362, अतिवेगाने वाहन चालवणे 829, सिटबेल्ट प्रकरणी 303, चुकीच्या लेनमधून वाहन चालविणारे 121, धोकादायक पार्कींग 391, ट्रीपल सीट 135 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
विमा नसलेली 201 वाहने, पियुसी नसलेली 145 वाहने, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण नसलेली 108, रिफ्लेक्टर/टेल लँप नसलेली 30 वाहने एकूण 3 हजार 714 प्रकरणांमध्ये 25.64 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
वर्षभरामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्या 3 हजार 149 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणारे 902, अतिवेगाने वाहन चालवणे 10292, सिटबेल्ट प्रकरणी 1564, चुकीच्या लेनमधून वाहन चालविणारे 124, धोकादायक पार्कींग 403, ट्रीपल सीट 302 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
विमा नसलेली 3036 वाहने, पियुसी नसलेली 3035 वाहने, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण नसलेली 2984, रिफ्लेक्टर/टेल लँप नसलेली 1389 वाहने एकूण 23 हजार 395 प्रकरणांमध्ये 378.01 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात सातारा आरटीओकडे 35 हजार 758 इतक्या नवीन वाहनांची नोंद झाली आहे.