निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मोठा फटका!! IT ने बजावली 1,700 कोटी रुपयांची नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) काळामध्ये काँग्रेस पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. नुकतीच आयकर विभागाने काँग्रेसला 1,700 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. तर दुसऱ्या, बाजूला दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) 4 मूल्यांकन वर्षांच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेस आवाहन देणारी याचिका फेटाळल्यानंतर पक्षाला ही नोटीस बजावण्यात आली असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आता नोटिशीला काँग्रेस कायदेशीर पद्धतीने आवाहन देणार आहे.

आयकरकडून काँग्रेसला आलेल्या या नोटीसची पुष्टी काँग्रेसचे वकील विवेक तन्खा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सांगितले आहे की, आयकर विभागाकडून आलेली ही नोटीस अयोग्य आहे. त्यामुळे तिला कायदेशीर आव्हान देण्यात येणार आहे. आम्हाला मूल्यांकन आदेशांशिवाय मागणी नोटीस देण्यात आली आहे. म्हणजेच काँग्रेसचीत निवडणुकीच्या काळात आर्थिक गळपेची केली जात आहे. तसेच 1,700 कोटी रुपयांची ही नोटीस मुख्य कागदपत्रांशिवाय पाठवण्यात आली असल्याचा आरोप देखील तन्खा यांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या 13 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाने काँग्रेसला 105 कोटी रुपयांच्या थकबाकीच्या प्रकरणासाठी नोटीस बजावली होती. याप्रकरणीच आयकर विभागाने काँग्रेसला 210 कोटींचा दंडही ठोठावला होता. इतकेच नव्हे तर विभागाने काँग्रेसची बँक खाते देखील गोठवली होती. आयकर विभागाने केलेल्या याच कारवाईविरोधात काँग्रेसने न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयाकडून ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा आयकर विभागाने कारवाई करत काँग्रेसला 1,700 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.