नागपुरात स्कूल व्हॅनचा अपघात; 18 विद्यार्थी थोडक्यात बचावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर जिल्ह्यातील बेसा घोगली रोडवर आज सकाळच्या सुमारास स्कूल व्हॅन नाल्यात पडल्याची घटना घडली. या अपघातावेळी व्हॅनमध्ये 18 शाळकरी विद्यार्थी होते. यामध्ये तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी पोद्दार स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल व्हॅन निघाली होती. व्हॅन नाल्याजवळ आली असता त्यातील चालकाचे नियंत्रण सुटले व व्हॅन सरळ शेजारील नाल्यात पडली. यावेळी त्याठिकाणी रहदारी असल्याने नागरिकांनी सर्व मुलांना लगेच बाहेर काढले.

या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी होते तसेच चालक भरधाव वेगाने व्हॅन चालवल्यामुळे अपघात झाला. या घटनेची माहिती शाळेला व पालकांना देखील लगेच माहिती देण्यात आली.