सहा किलोमीटर रस्त्यासाठी खर्च करणार 19 कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून ओळख असणारे म्हैसमाळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक पावसाळ्यामध्ये महेश माळाकडे वळतात. परंतु रस्ता खराब असल्यामुळे पर्यटकांची चांगलीच फजिती होते. आता या रस्त्याचा मुहूर्त लागला असून खुलताबाद कमान ते महेश माळ घाटाच्या पुढे या सहा किलोमीटर अंतरावरच्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर 19 कोटी रुपयांची नवी निविदा काढली आहे.

रस्ता अर्धवट ठेवणाऱ्या नाशिक येथील एटीआर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीस यापूर्वीच प्रतिदिन दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. खुलताबाद ते म्हैसमाळ या रस्त्याचे कंत्राट नाशिकच्या कंपनीला 21 जुलै 2018 रोजी देण्यात आले होते. दोन वर्षात हे काम होणे अपेक्षित होते. मात्र या कामाची मुदत 20 जुलै 2020 रोजी संपली होती.

त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कंत्राटदारास दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. 20 जुलै 2019 रोजी दुसरी मुदतवाढ संपली तरीही कंत्राटदाराने तीन वर्षात दहा कोटी रुपयांचे 30 टक्केच काम केले. त्यापैकी 9 कोटी रुपये अदा करण्यात आली असून 1 कोटी रुपयांची देयक शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. आता नव्याने 19 कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे. निविदा दाखल करण्याची मुदत 26 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. आता 10 मीटरचा सिमेंट रस्ता केला जाणार आहे.

Leave a Comment