कोरबा : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील कोरबा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणीने विष पिऊन आत्महत्या (suicide) केली आहे. विष घेण्यापूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत जान मैं मर रही हूं असे म्हंटले आहे. तिने विष घेतल्याचे (suicide) नातेवाइकांच्या लक्षात येताच मध्यरात्रीनंतर तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. बाकीमोंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
कोरबा येथील बाकीमोंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजरा बस्ती येथे 19 वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पूजा घरात जेवण करून झोपली होती. मात्र, मध्यरात्री पूजाची तब्येत अचानक ढासळली. त्यामुळे घरच्यांनी तिची अधिक चौकशी केली असता तिने विष पिल्याचे (suicide) आपल्या घरच्यांना सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पूजा एक वर्षापूर्वी बांकीमोंगरा येथील एका कापडाच्या दुकानात काम करत होती. त्या ठिकाणी तीचे रोहित गंभीर नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. काही दिवसांपूर्वी दोघेही एकत्र घरातून पळून गेले होते. यानंतर पूजाच्या नातेवाईकांनी तीची समजूत काढून तिला घरी आणले होते. पूजाने विष पिण्यापूर्वी (suicide) रोहितला स्वतः विष घेत आत्महत्या करत आहे, असा मेसेजही पाठवला आणि मोबाईलवर रडत विष पितानाचा व्हिडिओ बनवला. पूजाच्या आत्महत्या (suicide) करण्यामागे रोहित जबाबदार आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???