देशात कोरोनाबाधितांची संख्या ६ लाखांवर; गेल्या २४ तासांत १९,१४८ नवे रुग्ण सापडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून दररोज देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्यानं झालेल्या वाढीमुळं देशात कोरोनाबाधितांची संख्या ६ लाखांवर पोहोचली आह. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४ हजार ६४१ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दिसरभरात ४३४ जणांचा बळी गेला आहे. तर सध्या देशात २ लाख २६ हजार ९४७ अ‍ॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८५९ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान, आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार देशभरात १ जुलै पर्यंत एकूण ९० लाख ५६ हजार १७३ नमूने तपासले असल्याची माहिती दिली. यापैकी २ लआख २९ हजार ५५८ नमून्यांची चाचणी बुधवारी करण्यात आली. गेल्या १२ दिवसांमध्ये देशात तब्बल २ लाख करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सध्या ६० टक्क्यांवर पोहोचलं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जगभरात आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली आहे. तर जगभरात आतापर्यंत ५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment