या पोरींना म्हणावं तरी काय? स्कुटर घेऊन थेट घराच्या छतावरच अडकल्या; Video व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोशल मीडिया असे एक प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर दररोज वेगवेगळ्या भागातील निरनिराळे, व्हिडिओ व्हायरल होत असतात. याचं व्हायरल व्हिडिओंचा आनंद नेटकरी घेताना दिसतात. मात्र सध्या सोशल मीडियावर आगामी निवडणुकीच्या व्हिडिओ, बातम्या ट्रेनिंगमध्ये असल्या तरी या सगळ्यात एका भलत्याच व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये, दोन मुली स्कूटर घेऊन छतावर अडकलेल्या दिसत आहेत. त्यामुळेच या मुली छतावर कशा अडकल्या? का त्या कोणता स्टंट करत होत्या? असा प्रश्न विचारला जात आहे.

इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवरील “INFO JAWA BARAT” या पेजवरून दोन मुलींचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, दोन मुली स्कूटर घेऊन घराच्या छतावर अडकलेल्या दिसत आहेत. त्यांना कोणतीही हानी झाली नसली तरी घराच्या छताचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. तर इतर लोक या मुलींना आणि स्कूटरला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलींची अवस्था पाहता त्या कोणत्यातरी स्टंट करत असाव्यात असा अंदाज बांधला जात आहे.

सध्या सोशल मीडियावर हाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1.7 मिलियन वेळा शेअर करण्यात आले आहे. तर, 20 हजारपेक्षा जास्त कमेंट्स या व्हिडिओवर करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ 16.8 मिलियन वेळा पाहण्यात आला आहे. अनेकांनी तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी मुलींची अवस्था पाहून असे स्टंट इतर कोणी करू नये असा सल्ला दिला आहे. मात्र या एका व्हिडिओमुळे नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे.

दरम्यान, सध्याच्या घडीला तरुण वर्ग वाहनांसोबत वेगवेगळे स्टंट मारताना दिसून येतो. गाडी हवेत उंचावणे, जास्त वेगाने चालवणे, हेल्मेट न वापरणे, अशा कृती सहसा तरूण मुले करत असतात. परंतु अनेकवेळा त्यांनी केलेले हे स्टंट त्यांच्याच जीवावर देखील बेततात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये देखील असेच परिस्थिती निर्माण झाल्याची दिसत आहे.