खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुली बुडाल्या तर 7 मुलींना वाचवण्यात यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील खडकवासला धरणात पोहायला गेलेल्या २ मुली बुडाल्याची घटना समोर आली आहे. तर यावेळी स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे बाकी ७ मुलींना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोऱ्हे खुर्द गावाच्या हद्दीत कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणामध्ये पोहण्यासाठी 9 मुली पाण्यात उतरल्या होत्या. परंतु यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने या सर्व मुली पाण्यामध्ये बुडू लागल्या. सुदैवाने त्याच वेळी जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात धाव घेतली. यावेळी ९ पैकी ७ मुलींना वाचवण्यात यश आलं तर २ मुलीं धरणात बुडाल्या.

या घटनेनंतर पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व पोलीस हवालदार दिनेश कोळेकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. धरणामध्ये बुडालेल्या अन्य २ मुलींचा शोध घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आले असून या दोन्ही मुलींचा शोध सुरु आहे.