Satara News : पुसेसावळीत 2 गटात जोरदार राडा; संतप्त जमावाने तोडफोड करत दुकानांना लावली आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेसावळी येथे दोन गटात चांगलाच राडा झाला. यावेळी झालेल्या राड्यात संतप्त झालेल्या युवकांच्या जमावाने दुकानांची तोडफोड करत आग लावल्याची घटना रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या जमावाने रस्त्यावर उतरत गोंधळ घातल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ०९/१०/२०२३ रोजी पुसेसावळी येथे एका व्यक्तीने सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. सदर पोस्टवरुन रात्री उशीरा युवकांच्या दंगल उसळली.

या दंगलीत व  जाळपोळीत 2 दुकाने आणि 2 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह 2 डीवायएसपी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या 2· जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या महत्वाचे आवाहन…

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ०९/१०/२०२३ रोजी पुसेसावळी येथे एका व्यक्तीने सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. सदर पोस्टवरुन लोकांचा गैरसमज होवून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला होता. सदर ठिकाणी तात्काळ सातारा पोलीसांनी अधिकारी व अंमलदार यांचे स्टाफने प्रतिसाद देवून सदर ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणून सध्या पुसेसावळी व परिसरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू दिलेला नसून सध्या सदर ठिकाणी शांतता आहे. तसेच सदर ठिकाणी आवश्यक त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने जिल्हयातील नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मिडीयाव्दारे समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारीत करुन नयेत जेणेकरुन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क व दक्ष राहुन काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.