भाजपमध्ये प्रवेश करू शकतात ‘हे’ 2 भारतीय क्रिकेटपटू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणूका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. देशात इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित एनडीए यांच्यांत मुख्य लढत होईल. काहीही करून नरेंद्र मोदी याना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करायचे यासाठी भाजपकडून (BJP) सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणजे येत्या काळात भारतीय क्रिकेट संघातील २ माजी क्रिकेटपटू लवकरच भाजपचा झेंडा हाती घेण्याची शक्यता आहे. यातील एक क्रिकेटपटू आधीपासूनच राजकारणात सक्रिय आहे तर दुसरा क्रिकेटपटू प्रथमच राजकारणात आपली दुसरी इनिंग सुरु करेल. हे दोन क्रिकेटपटू कोण आहेत ते जाणून घेऊयात…..

यातील पहिला क्रिकेटपटू म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू…. भाजप मधून काँग्रेसमध्ये गेलेले नवज्योत सिंग (Navjot Singh Siddhu) याना भाजपच्या विचारसरणीचा आणि पक्षाचा एकूणच अनुभव आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार न केल्याने संतापून त्यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र तिथेही त्यांना म्हणावं असं विशेष काही मिळालं नाही. आता सध्याची एकूण राजकीय परिस्थिती पाहता नवज्योत सिंग सिद्धू आपल्या जुन्या पक्षात परत येऊ शकतात अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

युवराज सिंग करणार भाजप प्रवेश??

नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि युवराज सिंह (Yuvraj Singh) एकत्र दिसले होते, तेव्हापासून युवराज सिंह भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच मीडिया रिपोर्ट्स नुसार, गुरुदापूरचे खासदार सनी देओल पुन्हा एकदा निवडणूक लढवणार नाहीत. तसेच भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार गुरुदापूरचे लोक विद्यमान खासदार सनी देओल यांच्या कामावर खूश नाहीत. त्यातच आता पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनामुळे वातावरण चिघळले आहे. अशावेळी आपल्या विरोधी वार असताना सनी देओल यांच्यापेक्षा जास्त तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात भाजप आहे. त्यामुळे युवराज सिंग त्यांच्यासाठी बेस्ट पर्याय ठरेल. युवराज सिंगने भाजपचा झेंडा हातात घेतल्यास पंजाब शिवाय हरियाणामध्ये सुद्धा भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.