हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात (CM Ladaki Bahin Yojana) एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज या योजनेमध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. हे बदल नेमके कोणते आहेत आणि या बदलांमुळे कोणाला फायदा होणार आहे याविषयी आपण जाणून घेऊया.
विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे की, यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी 60 वर्ष वयोगटापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती. परंतु आता ही अट काढून टाकण्यात आली आहे. त्याऐवजी वयोमर्यादा 65 वर्ष करण्यात आली आहे. त्याचबरोबर जमिनीच्या मालकीची देखील अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. लक्षात ठेवा की, लाडकी बहीण योजनेसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. या अर्जासोबत पुढे देण्यात आलेली कागदपत्रे जोडावीत.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती??
आधार कार्ड
अधिवास प्रमाणपत्र वा जन्म दाखला
बँक पासबुकची झेरॉक्स
पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
योजनेच्या अटी मान्य असलेले हमीपत्र
हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.
अर्ज कुठे भरता येईल?
अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे
अर्ज भरण्याची अंतिम तारीख
अर्ज प्रक्रियेला १ जुलैपासून सुरुवात झाली आहे.
15 जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल.