अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकले, जव्हारमधील संतापजनक घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जव्हार/पालघर : हॅलो महाराष्ट्र – पालघर जिल्ह्यातील जव्हार या ठिकाणी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कुटुंबाची असलेली आर्थिक परिस्थिती आणि अगतिकता याचा फायदा घेऊन जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री (2 minor girls sold for child labor) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मनीषा नरेश भोये आणि काळू नरेश भोये अशी या अल्पवयीन मुलींची नावे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपाळाकडे मनीषा 3 वर्षांपासून तर काळू एक वर्षापासून बालमजुरीचे काम करत होती. मागील काही वर्षांपासून या दोन्ही चिमुकल्या या मेंढपाळाकडे (2 minor girls sold for child labor) मेंढ्यांची साफसफाई, घरगुती काम, मेंढ्यांसोबत गुराखी जाणे हि कामे करत होत्या. या बदल्यात या मुलींच्या कुटुंबियांना वर्षाकाठी 12 हजार रुपये आणि एक मेंढी देण्याचं आश्वासन (2 minor girls sold for child labor) मेंढपाळाकडून देण्यात आले होते.मात्र प्रत्यक्षात वर्षाला अवघे पाचशे रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली.

श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेतल्यामुळे हा संपूर्ण प्रकार (2 minor girls sold for child labor) उघडकीस आला. यानंतर मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळा विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात कलम 3(1) अंगर्गत गुन्हा दाखल झाला असून आठ वर्षीय मनीषाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले तर सहा वर्षीय काळु भोये हिचा जव्हार पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जव्हार पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर