Tuesday, January 31, 2023

प्रतापगडावर अफझलखान कबर परिसरात आणखी 2 कबरी आढळल्या : Video पहा

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्या लगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले. या ठिकाणी अफजलखानाच्या कबर शेजारीच सय्यद बंडा याची देखील कबर आहे. मात्र, अनधिकृत बांधकाम पाडत असताना, या दोन्ही कबरीच्या परिसरात काही अंतरावरच आणखी दोन कबरी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता या कबरीचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासन व इतिहास तज्ञाकडून केला जावू लागला आहे.

याबाबत यातील एक कबर ही सेविकऱ्याची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि दुसरी कबर शिवकालीन नसल्याचे दिसून येत आहे. आज आढळलेल्या या दोन्ही कबरी अलीकडच्या काळातील असल्याचे स्पष्ट होत आहे. या कबरीवर कोणतीही माहिती लिहलेली नाही.

- Advertisement -

प्रतापगड पायथ्याशी अफझलखान व सय्यद बंडा यांची कबर आहे. या कबर परिसरात अतिक्रमण केलेले होते. अखेर प्रशासनाने कोर्टाच्या आदेशाची अमंलबजाबणी करीत अतिक्रमण हटविले आहे. परंतु याच परिसरात आता या दोन कबर परिसरात आणखी दोन कबर सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच या कबरीची माहिती समोर आणण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहेत.