महाबळेश्वर रोडवर झायलो व दुचाकीच्या अपघात 2 जण जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

महाबळेश्वर- मेढा रोडवरील चिंचणी गावच्या हद्दीत झायलो कार व दुचाकी समोरासमोर धडक झाली. अपघातात दुचाकी वरील बसलेले दोन जण जागीच ठार झाले. तर चारजण जखमी झाले आहेत. या अपघातात रघुनाथ दत्तात्रेय चिकणे (रा. मेढा) व भरत यदु शेलार ( रा. थोरली काळोशी) अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वर- मेढा रोडवर हा अपघात झाला. झायलो व दुचाकी गाडी क्र. (एमएच- 11- बीजे- 4696) या दोन वाहनांच्यात अपघात झाला. झायलो गाडीतील एकूण चार जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदरचा अपघात तीन वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

अपघाताची सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. या अपघातामध्ये मेढा येथील रघुनाथ चिकणे व भरत यदु शेलार थोरली काळोशी हे दोघेही पार्टी पतसंस्थेमध्ये कर्मचारी होते. साताराच्या दिशेने जात असतानाच समोरून येणाऱ्या झायलो कारला दुचाकी जाऊन धडकली. या अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. लोकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.