कोर्टाच्या परिसरातच महिला वकिलांमध्ये तुफान हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था- सध्या सोशल मीडियावर कोर्टाच्या परिसरातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये कोर्टातील दोन महिला वकील जोरदार हाणामारी (2 woman advocates fight) करताना दिसत आहेत. या ठिकाणी कायद्यानुसार लढणाऱ्या वकिलांनीच आपल्या हातात कायदा घेतला आहे. कोर्टात त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला आणि त्यांनी तिथंच एकमेकींना दे दणादण हाणायला (2 woman advocates fight) सुरूवात केली.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन्ही महिला वकील वकिलाच्या ड्रेसमध्ये (2 woman advocates fight) आहेत. त्या एकमेकींच्या झिंझ्या उपटत आहेत. एकमेकींना सटासट लगावत आहेत, लाथाबुक्क्यांनीही मारहाण करत आहेत. तिथं असलेले इतर वकील आणि काही लोक त्यांच्यामध्ये पडून त्यांना शांत कऱण्याचा प्रयत्न करतात. पण दोघीही ऐकत नाहीत. दोघींपैकी (2 woman advocates fight) एकही मागे हटायला तयार नाही. कुणी मध्यस्थी केली की थोडा वेळ शांत बसतात पण लगेच एकमेकींवर तुटून पडतात. आजूबाजूच्या लोकांनासुद्धा या महिलांना आवरणे अवघड झाले आहे.

हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्हा न्यायालयामध्ये घडला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या फॅमिली कोर्टाबाहेर हि हाणामारी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला वकील आपाआपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी कोर्टात आल्या होत्या. त्यावेळी काही कारणावरून त्यांच्यात वाद (2 woman advocates fight) झाला आणि यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. आजूबाजूच्या वकिलांनी हि हाणामारीची घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय