गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा!! वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या गुजरातमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे. तर, गुजरातमध्ये वीज पडून 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील आकडेवारी सरकारकडून सोमवारी जाहीर करण्यात आली. यानंतर घडलेल्या घटनेबाबत गृहमंत्री अमित शहा शोक व्यक्त केला. तसेच, स्थानिक प्रशासनाने आणि बचाव कार्याने नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचवावी असे आवाहन देखील गेले.

सोमवारी आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या अधिकाऱ्याकडून माहिती देण्यात आली आहे की, गुजरातमध्ये वीज पडल्यामुळे वीज जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चार जणांचा मृत्यू दाहोदमध्ये झाला आहे. तसेच, अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका अशा वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडल्यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सध्या नागरिकांची सावधगिरी बाळगावी असे, आवाहन प्रशासनाने केली आहे.

मुख्य म्हणजे, घडलेल्या या घटनेनंतर अमित शहा यांनी ट्विट करत म्हणले आहे की, “गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या अपरिमित हानीबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. स्थानिक प्रशासनाने मदतकार्यात गुंतले आहेत, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे,”

महाराष्ट्रात पावसाची हजेरी

दरम्यान, महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात रिमझिम सरी बरसात आहेत. कोकण, नाशिक, मुंबई, पुणे भागात देखील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांचे कामानिमित्त घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे.