2024 Year Prediction : 2024 बद्दल सर्वात मोठ्या भविष्यवाण्या; तुम्हालाही वाटेल भीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

2024 Year Prediction | आपल्या भविष्याची काळजी प्रत्येकाला असते. त्यामुळे प्रत्येकजण आपले भविष्य आधीच जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखवतो. तसेच नवीन वर्ष्याच्या सुरुवातीला तुम्हाला आपल्या सोबत कुठल्या गोष्टी वर्षभरात घडणार आहेत हे जर कोण अचूक पद्धतीने सांगू शकणार असेल तर तुमचीही उत्सुकता शेगेला पोहचेल. अश्याच प्रकारचे तर्क करणारे जागतिक पातळीवर नावाजलेल्यानी 2024 बद्दल लिहून ठेवले आहे. यापूर्वी तुम्ही बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस यांच्या भविष्यवाण्या ऐकल्या असतील किंवा काही वेळा त्या खऱ्या सुद्धा ठरलेल्या बघितल्या असतील. आता सुद्धा एका तिसऱ्याच व्यक्तीने 2024 बद्दल काही भविष्यवाण्या केल्या आहेत. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात

2024 बद्दल काय आहे भविष्यवाणी : 2024 Year Prediction

ओल्ड मूरच्या पंचांग नावाच्या या डायरीमध्ये दरवर्षी काही ना काही गोष्टी सांगितल्या जातात, त्या मागील काही वर्षात खऱ्या सुद्धा ठरल्या होत्या. ओल्ड मूरच्या भविष्यवाणी नुसार 2024 मध्ये जगभरात अनेक घटना घडतील ज्या मानवी जीवनावर  मोठा परिणाम घडवून आणणाऱ्या असतील. ओल्ड मूरने केलेल्या भविष्यवाणीनुसार, एक भयानक भूकंप होईल, जो केवळ एका देशाच्या नव्हे तर अनेक देशांच्या सीमांना हादरवेल.  यामुळे मोठ्या प्रमाणावर नासधूस होईल आणि अनेक रस्ते खराब होतील.  एवढेच नाही तर या वर्षी जगाला आर्थिक संकटही दिसणार आहे.  याशिवाय रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता  आहे असे देखील भविष्यवाणी (2024 Year Prediction) मध्ये लिहण्यात आले आहे.

ओल्ड मूरच्या पंचांगात यापूर्वी सुद्धा अनेक अचूक भविष्यवाण्या कऱण्यात आल्या होत्या. यामध्ये २०२३ पर्यंत लोक एलियन्सवर विश्वास ठेवतील असं त्यांनी म्हंटल होते. तसेच कोरोना महामारी, अमेरिकन निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव, मागील वर्षी झालेला पाणबुडीचा अपघात आणि त्यातील लोकांचा मृत्यू… ओहायोच्या ट्रेन अपघात याबद्दल त्यांनी केलेली भविष्यवाणी अगदी अचूक ठरली होती. त्यामुळे आता 2024 बद्दल त्यांनी केलेल्या भविष्यवाण्या (2024 Year Prediction) किती खऱ्या होतात हे आता पाहायला हवं.