सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित 21 हजार शेतकर्‍यांना 14 कोटींचा निधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे शासनाच्या कृषी विभागाकडून करण्यात आले होते. पंचनाम्यानंतर आता सात महिन्यानंतर शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सातारा जिल्हयातील 21 हजार 487 शेतकऱ्यांना 14 कोटी 4 लाख 18 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे भरपाईच्या प्रतिक्षेत असलेल्या बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. प्रशासनाकडूनही युद्धपातळीवर पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील फलटण, कोरेगाव, कराड, महाबळेश्वर, पाटण, खंडाळा, खटाव, माण, सातारा, जावली व वाई अशा 11 तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई शासनाकडून 21 हजार 487 शेतकऱ्यांच्या 5973.18 हेक्टरसाठी 14 कोटी 4 लाख 18 हजार रुपये नुकसानभरपाई मंजुर करण्यात आली आहे.

शेतकरी मित्रांनो, तुम्हांला सुद्धा सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही. आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या आणि घरात बसून सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी अर्ज करा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये सातबारा उतारा, जमीन मोजणी, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, आसपासची खत दुकानदार, कृषी केंद्र, पशु- खरेदी विक्री यांसारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मध्ये मिळतात. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

पहा तालुका आणि नुकसान भरपाईची रक्कम

1) फलटण तालुका : 2 हजार 658 शेतकऱ्यांच्या 873.20 हेक्टरसाठी 2 कोटी 28 लाख 44 हजार रुपये.

2) कोरेगाव तालुका : 684 शेतकऱ्यांच्या 207.73 हेक्टरसाठी 35 लाख 88 हजार रुपये.

3) कराड तालुका : 168 शेतकऱ्यांच्या 33.14 हेक्टरसाठी 6 लाख 7 हजार रुपये.

4) महाबळेश्वर तालुका : 544 शेतकऱ्यांच्या 175.87 हेक्टरसाठी 47 लाख 56 हजार रुपये.

5) पाटण तालुका : 372 शेतकऱ्यांच्या 40.61 हेक्टरसाठी 3 लाख 93 हजार रुपये.

6) खंडाळा तालुका : 7 हजार 780 शेतऱ्यांच्या 1855.37 हेक्टरसाठी 4 कोटी 33 लाख 25 हजार रुपये.

7) खटाव तालुका : 4 हजार 433 शेतकऱ्यांच्या 1547.52 हेक्टरसाठी 3 कोटी 64 लाख 39 हजार रुपये.

8) माण तालुका : 3 हजार 221 शेतकऱ्यांच्या 1050.37 हेक्टरसाठी 2 कोटी 58 लाख 46 हजार रुपये.

9) सातारा तालुका : 32 शेतकऱ्यांच्या 7.76 हेक्टरसाठी 1 लाख 11 हजार रुपये.

10) जावली तालुका : 73 शेतकऱ्यांच्या 3.18 हेक्टरसाठी 77 हजार रुपये.

11) वाई तालुका : 1 हजार 522 शेतकऱ्यांच्या 178.43 हेक्टरसाठी 24 लाख 32 हजार रुपये.