Friday, January 27, 2023

21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -

औरंगाबाद | पैठण तालुक्यातील पाचोड येथील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने ‘मम्मी-पप्पा मला माफ करा’ असे वाक्य वहीच्या पानावर लिहीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी 8 वाजेच्या सुमारास घडली. अद्याप तरुणीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, अंजली काकासाहेब जाधव, वय 21 वर्ष असे मृत तरुणीचे नाव आहे. अश्विनीचे वडील अंतरवाली खांडी, ता. पैठण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. अंजलीनेही नुकतेच पूर्ण केले होते. घरातील सदस्य अंगणात बसल्याचे पाहून अंजलीने घरात गळफास घेतला. आठ वाजेच्या सुमारास घरातील सदस्य जेवण करण्यासाठी घरात गेले असताना त्यांना अंजलीने गळफास घेतल्याचे घरच्यांचा निदर्शनास आले.

- Advertisement -

दरम्यान, घरातील सदस्यांच्या रडण्याच्या आवाजाने शेजारील नागरिक धावत आले. पाचोड पोलिसांना माहिती मिळताच पोलिसही दाखल झाले. अंजलीला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.