वळवण्यात आल्या 24 मेल एक्सप्रेस ; 50 लोकलच्या फेऱ्या केल्या रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रुळावरच ठिय्या मारला होता. याचा परिणाम येथून ये-जा करणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर झाला. यामुळे कर्जत खोपोली या मार्गावरील लोकल सेवा ठप्प पडली होती या मार्गावरील पन्नास लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर 24 मेल आणि एक्सप्रेस ठाणे, दिवा, पनवेल मार्गे सीएसएमटीच्या दिशेने वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना सीएसएमटी गाठण्यासाठी 15 ते 30 मिनिटे उशीर झाला होता

सुमारे 10 तासांनी वाहतूक सुरु

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ सीएसएमटी या लोकल सेवा सुरू असल्या तरी विलंबाने धावत असल्यामुळे उर्वरित स्थानकांवर संध्याकाळी पीक आवरला गर्दी झाली होती. सुमारे दहा तासांनी म्हणजे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी बदलापूर आणि कर्जत खोपोली दरम्यान लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यापूर्वी हलके इंजिन मार्गावरून चालवून मार्गाची सुरक्षितता निश्चित करण्यात आली. मंगळवारी सकाळी 9:30 नंतर सीएसएमटी ते अंबरनाथ पर्यंतच्या अपडाऊन मार्गावरील सेवा सुरू होऊन सर्वसाधारण वेळेत धावत होत्या अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

बसेस चालवण्याची मागणी

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कल्याण कर्जत यादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी 100 बसेस चालवण्यात याव्यात अशी विनंती रेल्वे कडून येथील विविध प्राधिकरणांना करण्यात आली होती. त्यानुसार सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 55 बसेस चालवण्यात आल्या होत्या असं रेल्वे कडून सांगण्यात आलं. कोयना एक्सप्रेस बदलापूर ते कल्याण आणि नंतर दिवा आणि पनवेल मार्गे कर्जत कडे पाठवण्यात आली.

‘या’ गाड्या वळवण्यात आल्या

डाऊन मार्गावर उदयपूर, मैसूर, सीएसएमटी, चेन्नई, श्री गंगानगर, तिरुचिरापल्ली, सी एस एम टी -हैदराबाद सुपरफास्ट, सीएसएमटी- भुवनेश्वर या गाड्या वळवण्यात आल्या. तर अप मार्गावरील चेन्नई एलटीटी, हैदराबाद- सीएसएमटी, यशवंतपुर, बारमेर, कोईमतुर- एलटीटी, सोलापूर- सीएसएमटी वंदे भारत, पुणे -निजामुद्दीन, दुरंतो, चेन्नई -सीएसएमटी या गाड्या वळवण्यात आल्या