व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दाऊदची माहिती देणाऱ्यास 25 लाखांचे बक्षीस; NIA ची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधातील कारवाई आणखी तीव्र झाली आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या ‘डी’ कंपनीच्या टोळीतील संबंधांची माहिती देणाऱ्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रोख बक्षीस जाहीर केले आहे. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमवर NIA ने 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. छोटा शकीलवर 20 लाख रुपये तसेय अनिस, चिकना आणि मेननवर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दाऊद इब्राहिमने भारतात शस्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनी नोटांची (एफआयसीएन) तस्करी करण्यासाठी एक युनिट तयार केले आहे. आणि पाकिस्तानी एजन्सी आणि दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने दहशतवादी हल्ले घडवण्याची योजनाही आखली आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, एजन्सीने दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम उर्फ ​​हाजी अनीस, जवळचे नातेवाईक जावेद पटेल उर्फ ​​जावेद चिकना, शकील शेख उर्फ ​​छोटा शकील आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ ​​टायगर मेमन यांना बक्षीस जाहीर केले आहे. दाऊदवर 25 लाख रुपये, छोटा शकीलवर 20 लाख रुपये, अनीस, चिकना आणि मेमनवर 15 लाख रुपये जाहीर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटासह भारतातील अनेक प्रकरणांमध्ये दाऊद वॉन्टेड आहे. विशेष म्हणजे दाऊदशिवाय लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिद्दीनचा सय्यद सलाहुद्दीन आणि निकटवर्तीय अब्दुल रऊफ असगर यांचाही भारतातील मोस्ट वाँटेड यादीत समावेश आहे.